पुणेमनोरंजनशिक्षण

सॉफ्टच्या विद्यार्थिनींच्या कल्पकतेचा अविष्कार; ‘डिझाइन शोकेस २०२६’ फॅशन शो दिमाखात संपन्न.

पुणे – महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ फॅशन टेक्नोलॉजी (सॉफ्ट) तर्फे आयोजित ‘डिझाइन शोकेस २०२६’ हा फॅशन शो नुकताच कर्वेनगर येथील पंडित फार्म्स येथे उत्साहात पार पडला. फॅशन डिझायनिंग,आंतरविद्याशाखीय (इंटरडिसिप्लिनरी) आणि ज्वेलरी डिझायनिंग या विभागाच्या १७० हून अधिक उदयोन्मुख विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण वेशभूषांनी प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाची प्रमुख संकल्पना ‘शाश्वत फॅशन’ (Sustainability) ही होती. या मधे एकूण १४ विविध श्रेणींमधून भारतीय हस्तकला आणि आधुनिक डिझाइनचा सुरेख संगम पाहायला मिळाला. पुनर्वापर (Recycling) आणि त्रिमिती प्रिंटिंग (3D Printing) सारख्या आधुनिक तंत्रांचा वापर करून साकारलेले पोशाख या शोचे वैशिष्ट्य ठरले. फॅशन शो बरोबरच फॅशन कम्युनिकेशनच्या विद्यार्थिनींनी व्हिज्युअल मर्चंडायझिंग आणि स्टायलिंगचे प्रदर्शन भरवले होते, तसेच टेक्सटाईलच्या विद्यार्थिनींनीही खूप आकर्षक सादरीकरण केले होते.

कार्यक्रमास भारतीय वस्त्र उत्पादक संघटनेचे अध्यक्ष संतोष कटारिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र देव, विश्वस्त मिलिंद लेले, सचिव डॉ. पी.व्ही.एस. शास्त्री, व्यवस्थापन समिती सदस्य सीमा कांबळे, अभय कुलकर्णी, मंदार पारखी, सॉफ्टच्या प्राचार्या डॉ. गरिमा भल्ला, डॉ. सुरेश कराळे आणि फॅशन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शोचे परीक्षक (Juries)
आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर निवेदिता साबू, वेशभूषा दिग्दर्शक केन फर्न्स, वस्त्र उत्पादक संघटने चे निखिल फुरिया, फॅशन डिझायनर मंगेश महादेव यांनी फॅशन शो चे परीक्षण केले.

फॅशन डिझाईन विभाग
सर्वोत्कृष्ट कलेक्शन पुरस्कार-
सर्व वयोगटाची पसंद असलेल्या डेनिम आणि जीन्स वर आधारित ‘जीन’ हित मी जारी’ कलेक्शन – आरुषी अग्रवाल, यशवी अग्रवाल, प्रशंसा असुदानी, अदिती चव्हाण, योगिता जाधव, सिमरन जैस्वाल, किनल जोटांगिया, सृष्टी केशरवानी, कृष्णा मिश्रा, अंजली नागतिलक आणि आकांक्षा सिन्हा.

टेक्सटाइल डिझायनिंग विभाग ‘शाश्वतम’ कलेक्शन सर्वोत्कृष्ट पुरस्कार-
अनुष्का अस्थाना, आराधना साहू, गुंजन भोसले, नंदिनी बियाणी आणि विकेशा काळे
आंतरविद्याशाखीय विभाग ‘अनफोल्डिंग द मोमेंट.. बिटवीन’ आंतरविद्याशाखीय बेस्ट कलेक्शन पुरस्कार-
वैष्णवी बाबानगरे, हर्षिता चौधरी, इनिका जोशी, आर्या काळे, साक्षी नाझरे, मैथिली रेळकर, मृदुला रामकृष्णन, रुतिका साखरे, ज्वाला सागरिका एस, अनन्या शिंदे आणि सोहम शाह.
फॅशन कम्युनिकेशन विभाग
बेस्ट स्टाईलिंग ‘भुजोडी’ कलेक्शन पुरस्कार –
श्रिया करंदीकर, मोहिनी क्षीरसागर, रुचिता कुमार, अस्मी इंगळे आणि प्रार्थना भिडे,

फॅशन कम्युनिकेशन विभाग
बेस्ट विंडो डिसप्ले ‘श्रुती मंगेश’ पुरस्कार
चंद्रिका जैन, नुपूर पोवार, दीक्षा जीवणे, संजना जगताप आणि भार्गवी कुलकर्णी,

‘अम्रीतम’ सर्वोत्कृष्ट आभूषण पुरस्कार
ख्वाइश राजपुरोहित

माध्यम समन्वयक,
करुणा पाटील,
९८६०४०२७८०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button