आरोग्यपुणे

हडपसरमध्ये अत्याधुनिक GI Physiology Lab सुरू; पचनसंस्थेच्या आजारांच्या निदानासाठी नवी दिशा…!

जागतिक पचन आरोग्य दिनानिमित्त डॉ. म्हस्के हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम…

पुणे , प्रतिनिधी – हडपसर येथील डॉ. म्हस्के हॉस्पिटलमध्ये जागतिक पचन आरोग्य दिनाचे औचित्य साधून अत्याधुनिक GI Physiology Lab चे उद्घाटन करण्यात आले. या सुविधेमुळे ॲसिडिटी, गॅस, IBS (Irritable Bowel Syndrome), बद्धकोष्ठता आणि इतर पचनसंस्थेशी संबंधित विकारांचे अधिक अचूक निदान करणे शक्य होणार आहे.

नवीन प्रयोगशाळेमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या साहाय्याने अन्ननलिका, जठर आणि आतड्यांच्या कार्यक्षमतेची सखोल तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या समस्यांचे मूळ कारण शोधून योग्य उपचार देणे अधिक सोपे होणार आहे.
डॉ. म्हस्के हॉस्पिटलच्या या उपक्रमामुळे पुणे आणि परिसरातील रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होणार असून आधुनिक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.

पचनसंस्थेच्या विकारांमुळे त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी ही सुविधा आशादायी ठरणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button