कला

स्व. श्री प्रकाशचंद्र सुराणा इतिहासकार पुरस्कार सोहोळ्याचे २६ जुलै रोजी आयोजन

स्व. श्री प्रकाशचंद्र सुराणा इतिहासकार पुरस्कार सोहोळ्याचे २६ जुलै रोजी आयोजन

स्व. श्री प्रकाशचंद्र सुराणा इतिहासकार पुरस्कार सोहोळ्याचे २६ जुलै रोजी आयोजन.

डॉ. श्रद्धा कुंभोजकर आणि केविन स्टँडेज यंदाच्या पुरस्काराचे मानकरी.

पुणे – क्वांटम फाउंडेशनच्या विविध उपक्रमांपैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे प्रोजेक्ट धरोहर. डॉक्टर प्रतीक सुराणा यांनी स्थापन केलेल्या क्वांटम फाउंडेशनच्या माध्यमातून प्रोजेक्ट धरोहर अंतर्गत इतिहासाशी संबंधित अनेक उपक्रम राबविले जातात. या मधे इतिहास संबंधित कार्य आणि महत्त्वपूर्ण योगदाना बद्दल  पुरस्कार देणे, तरुण पिढीला इतिहास आणि वारसा यांच्याशी संलग्न होण्यासाठी हेरिटेज वॉक, हिस्टरी क्लब, कार्यशाळा असे उपक्रम राबविणे आणि इतिहास विषयात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि संधी मिळवून देणे समाविष्ट आहे. डॉ. प्रतिक सुराणा यांचे वडिल कै. प्रकाशचंद्र सुराणा यांचा इतिहासाचा अभ्यास दांडगा होता. ऐतिहासिक प्राचीन स्थळांच्या संदर्भात इतिहास, परंपरा आणि संस्कृती समजून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा स्व. श्री प्रकाशचंद्र सुराणा इतिहासकार पुरस्कार इतिहासाच्या प्राध्यापिका आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख श्रद्धा कुंभोजकर यांना तर डिजिटल इतिहासकार पुरस्कार पुरातत्वशास्त्रज्ञ, इतिहासकार युनायटेड किंग्डमच्या केविन स्टँडेज यांना देण्यात येणार असल्याची माहिती क्वांटम फाउंडेशनचे संस्थापक डॉ. प्रतीक सुराणा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हा कार्यक्रम येत्या २६ जुलै रोजी   रोजी येरवडा येथील डेक्कन कॉलेजच्या  दीक्षांत सभागृहात दुपारी  ४ वाजता पार पडणार आहे. पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून या कार्यक्रमास  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा चे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, क्वांटम फाउंडेशनच्या विश्वस्त पुष्पा सुराणा, डेक्कन कॉलेज चे कुलगुरू प्रसाद जोशी, प्रा. सोनल कुलकर्णी (भाषाशास्त्र विभाग, डेक्कन कॉलेज), प्रा. शाहिदा अन्सारी (एचओडी पुरातत्व विभाग, डेक्कन कॉलेज) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विनामूल्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button