फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे तर्फे रोप्यमहोत्सवानिमित्त पी एस पी स्पेक्ट्रम विशेषांकाचे प्रकाशन
फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे तर्फे रोप्यमहोत्सवानिमित्त पी एस पी स्पेक्ट्रम विशेषांकाचे प्रकाशन
फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे तर्फे रोप्यमहोत्सवानिमित्त पी एस पी स्पेक्ट्रम विशेषांकाचे प्रकाशन
फोटोग्राफी ऑफ सोसायटी ऑफ पुणे तर्फे 10 ऑगस्ट 2025 ते 13 ऑगस्ट 2025 दरम्यान फोटो फेस्ट1 लेन्स लेगसी व फोटो फेस्ट 2 – सिल्वर शोकेश प्रदर्शनाचे 17 ते 19 ऑगस्ट 2025 दरम्यान पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे सकाळी 10 ते 8 या वेळेत आयोजन*
पुणे -फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे तर्फे रोप्यमहोत्सवानिमित्त पी एस पी स्पेक्ट्रम विशेषांकाचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी ट्रॅव्हल व लँडस्केप फोटोग्राफर सुहास असणीकर, फाईन आर्ट फोटोग्राफर व फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणे चे माजी अध्यक्ष अध्यक्ष सुनील कपाडिया, बर्ड फोटोग्राफर एच सतीश , स्मार्ट फोटोग्राफी मॅक्झिनचे चीफ टेक्निकल एडिटर रोहिंतन मेहता, प्रॉडक्ट फोटोग्राफर विकास शिंदे, पी एस पी स्पेक्ट्रम मॅगझिनच्या संपादिका दर्पणा आठले, फोटोग्राफी सोसायटी ऑफ पुणेचे अध्यक्ष संजय वायचळ, उपाध्यक्ष रामनाथ भट, सचिव जी. करुणाकर, खजिनदार किशोर जगदाळे, कार्यक्रम प्रमुख मानव जैन आदी संस्थेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. या छायाचित्र प्रदर्शनात ट्रॅव्हल अँड ॲडव्हर्टायझिंग फोटोग्राफी, फाईन आर्ट फोटोग्राफी, लँडस्केप फोटोग्राफी, बर्ड वाईल्ड लाईफ नेचर फोटोग्राफी, ट्रॅव्हल अँड स्ट्रीट फोटोग्राफी या विषयांवर विशेष व्याख्यान व स्लाईड शो चे सायंकाळी 5 ते 8 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 10 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2025 दरम्यान पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे सकाळी 10 ते सायंकाळी 8 या वेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे.



