पिंपरी चिंचवडपुणेसमाजकारण

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षपदी परशुराम पवार यांची नियुक्ती

पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने श्री. परशुराम पवार यांची ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. समाजकार्य, संघटनात्मक योगदान आणि मराठा समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची दखल घेऊन महासंघाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

या नियुक्तीमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, त्यांचे हक्क, शासकीय योजनांचा लाभ तसेच समाजोपयोगी उपक्रम राबविण्यासाठी श्री. पवार कार्यरत राहणार आहेत. मराठा समाजातील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याचे काम ते करतील, असा विश्वास महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

श्री. परशुराम पवार यांच्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button