मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड कार्यकारिणीची घोषणा; किरण जोशी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण

पिंपरी, : मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. प्रदेश अध्यक्ष किरण जोशी यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी प्रदेश संघटक अरुण उर्फ नाना कांबळे, महिला पुणे जिल्हा अध्यक्षा मनीषा थोरात-पिसाळ, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष रोहित खर्गे तसेच पिंपरी-चिंचवड शहर महिला अध्यक्षा अर्चना मेंगडे यांची प्रमुख पदांवर नियुक्ती करण्यात आली.

कार्यकारिणीमध्ये दादाराव आढाव यांची कार्याध्यक्षपदी, गणेश मोरे यांची उपाध्यक्षपदी, बजरंग मासाळ यांची सचिवपदी, संतोष जाधव यांची खजिनदारपदी तसेच संदीप सोनार यांची संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली. याशिवाय नागेश खजूर्गीकर, बलभीम भोसले, उमेश सनस, सीताराम मोरे, उमेश यादव, संदीप सोनार, संटलाल यादव, श्रीधर जगताप आणि अजय कुलकर्णी यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

या कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, पक्षनेते प्रशांत शितोळे आणि नगरसेवक उत्तम केंदळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक इनामदार यांनी केले. प्रास्ताविक अरुण उर्फ नाना कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रोहित खर्गे यांनी मानले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटीसाठी तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मराठी पत्रकार संघ प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास व्यक्त केला.



