पिंपरी चिंचवड
कीर्तनकार, प्रवचनकार तथा संपादक-पत्रकार ह.भ.प. सिताराम महाराज मोरे यांची प्रथम कीर्तन सेवा संपन्न

पिंपरी
महाड–पोलादपूर वारकरी संप्रदायाचे सदस्य, कीर्तनकार व प्रवचनकार तसेच संपादक-पत्रकार ह.भ.प. श्री. सिताराम महाराज मोरे यांची प्रथम कीर्तन सेवा आज उत्साहात व भक्तिमय वातावरणात पिंपरी काळेवाडी येथे संपन्न झाली.
या कीर्तन सेवेत श्री. मोरे महाराज यांनी नामस्मरण, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि अध्यात्मिक विचार यांवर मार्गदर्शन करत उपस्थित भाविकांना भक्तीचा संदेश दिला. त्यांच्या प्रभावी निरूपणामुळे भाविक मंत्रमुग्ध झाले.
यावेळी गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी वृंद व विणेकरी यांनी उत्कृष्ट साथ देत कीर्तन सेवेची शोभा वाढवली. उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने कीर्तनाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी “राम कृष्ण हरी” च्या अखंड नामगजराने परिसर भक्तिमय झाला.



